“आप काँग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल आणि अरविंद केजरीवाल पंतप्रधानही होतील”

नवी दिल्ली | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. देशातील या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. यावर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आप आता राष्ट्रीय शक्ती आहे, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पंतप्रधान होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल, असं त्यांनी म्हटलंय.

सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झालं आहे. अरविंद केजरीवाल यांना याचं श्रेय जातं. या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला ही भेट दिली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसंच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. शेतकरी आंदोलन, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यावरुन गाजलेलं राजकारण या सगळ्यामुळे पंजाबच्या निवडणुका गाजल्या होत्या.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही डोकं वर काढू लागली होती. या सगळ्या घडामोडींत आज जे निकाल हाती आले आहेत, त्या अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबामध्ये निवडणुका लढवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का 

‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला