स्वत:च्याच लग्नात नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाच्या काळात अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडले आहेत. लग्न म्हटलं की, नाच-गाणं हे आलंच. तसेच खूप धमाल, मस्तीही असती.

आजकाल सोशल मीडियावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये गाण गातानाचे व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ डान्स करतानाचेही असतात. एवढंच नाहीतर काही व्हिडीओ खूप मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा यईल असे असतात.

त्याचप्रमाणे हल्ली सोशल मीडियावर लग्नातील खूप व्हिडीओ शेअर केले जातात. नवरा-नवरीचा एखादा विधी करतानाचा व्हिडीओ शूट करून, त्याच्या बॅकग्राऊंडला त्याला सुट होईल असं गाणं लावून तो व्हिडीओ पोस्ट केला जातो.

अशातच याच संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरीनेच आपल्या लग्नामध्ये भन्नाट डान्स केला असल्याचं दिसून येतं आहे. आपण लग्नामध्ये कलवऱ्यांना नाचताना पाहिलं असेल. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरीच आपल्या लग्नात नाचत आहे.

सुरूवातीला नवरी आणि नवरदेव स्टेजवर सोफ्यावर बसेलेले असतात. त्यानंतर अचानक नवरी नवरदेवाच्या जवळून उठते आणि पुढे जाते. तेवढ्यात एक गाण वाजू लागत आणि ती त्याच्यावर डान्स करायला सुरूवात करते. तिला अचानक आणि कोणतीही कल्पना नसताना डान्स करताना पाहून नवरदेव त्या नवरीकडे पाहतच राहतो.

गाण्याचा बीट पकडून नवरी आपल्या स्टेप्सही बदलत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. नवरीच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप लाईक्स आले असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेट्सही केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CSltkueJKmM/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

‘धूम मचाले’ म्हणत तरूण आपल्या गाडीसह थेट शिरला घरात, पाहा मजेशीर व्हिडीओ

काय सांगता! चक्क हवेत उडतोय पिझ्झा, विश्वास नसेल बसत तर पाहा व्हायरल व्हिडीओ

ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर अन्…, पाहा व्हि़डीओ

बॉडी बिल्डरसारखी बॉडी बनवणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

भर मंडपात मेहुणीने असं काही केलं की नवरदेवाचा झाला पोपट, पाहा व्हिडीओ