अबब…सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घट; वाचा आजचा दर

नवी दिल्ली | अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भिडले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, अशातच आता सोनं ख.रेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 550 रुपयांची घट झाली आहे. बुधवारी सकाळी एमसीएक्सवर सोन्याचे दर 47 हजार 240 रूपये प्रती तोळा ईतका होता. या दरात आज 550 रुपयांची घट होऊन एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 46 हजार 680 रुपये प्रती तोळा ईतके आहेत.

सोन्याबरोबरंच आज चांदीच्या दरात देखील मोठी घ.ट पहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी एमसीएक्सवर चांदीचा दर 69 हजार 600 रुपये प्रती किलो इतका होता. आज या दरात 100 रुपयांची घट होऊन आजचा चांदीचा दर 69 हजार 600 रुपये प्रती किलो इतका आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी! 7,199 रुपयांचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 599 रुपयात, जाणून घ्या भन्नाट ऑफर

जाणून घ्या बदाम खाण्याचे ‘हे आरोग्यदायी फायदे

गॅस सिलेंडरचा भ.डका! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

खडसेंविरोधात ईडीची का.रवाई! पुन्हा समन्सची नोटीस बजावून अ.टक करणार?

चालू मिटींगमध्ये बायको झाली आऊट ऑफ कंट्रोल नवऱ्याला केलं किस अन् मग…; पहा व्हिडीओ