अबब…दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले!

मुंबई | कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चालले आहेत. सलग गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ होत आहे. मात्र मागिल दोन दिवस दर वाढले नव्हते परंतू आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना गाडी चालवणं परवडेनास झालं आहे. रोजच्या दरवाढीमुळे लोकांकडून सरकावरविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर यामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर आता त्यापाठोपाठ डिझेलचा दर देखील शंभरी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे.

आज 23 फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पेट्रोल दर 97.34 रुपयांवर पोहचला आहे. तर डिझेलचा 88.44 रुपयांवर पोहचले आहे.

दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये आहे. म्हणजेच 2021 या वर्षाच्या सुरुवातीच्या 54 दिवसात दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपये आणि डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे. 2021 या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 83.71 रुपये होती. तर डिझेलची किंमत 73.87 रुपये होती.

दरम्यान, इंधनाच्या वाढत्या भावामुळे पेट्रोलचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. असं म्हणत काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक तरुण पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरुन घेत असल्याचं दिसतं होता. पेट्रोल पंपावर कर्मचारी पेट्रोल भरुन जसा नोझल बाहेर काढतो. तसा तो तरुण ते नोझल हिसकावून त्याच्या हातात घेतो. नोझलमध्ये एकही थेंब पेट्रोल राहू नये यासाठी तो तरुण पेट्रोल टॅंकमध्ये झटकतो. पेट्रोल पाईपवर करुन त्यातील संपूर्ण पेट्रोल खाली झालंय का, याची खात्री करतो.

सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच विरोधीपक्षांमध्ये या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपाची खेळी सुरु असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कचरावेचक भावांच्या ‘या’ कलेवर आनंद महिंद्रा फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…