अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोेन्याला प्राधान्य देत आहेत. सोन्याच्या वाढत्या भावामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, सध्या सोनं खरेदी करू इच्छिणार्यांसाठी एक खुशखबर आहे.

गेल्यावर्षीच्या सर्वाेच्च स्तरापेक्षा सोनं तब्बल 10 हजार रूपयांंनी स्वस्त झालं आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार रूपयेे प्रती तोळ्याच्या वर गेले होते. मात्र, सध्या सोन्याचे दर सर्वाेच्च स्तरावरूव खूप जास्त खाली आले आहेत.

शुक्रवारी सोन्याचे दर 46 हजार 847 रूपये प्रती तोळा इतके खाली आले होते. गेल्यावर्षीपेक्षा हे दर जवळपास तब्बल 10 हजार रूपयांंनी कमी आहेत. सध्या सोनं 50 हजार रूपये प्रती तोळ्यापेक्षा कमी राहत आहे. यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणार्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं मानलं जात आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. मोठ्या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचे दर आज एमसीएक्सवर 47 हजार 340 रूपये प्रती तोळ्यावर स्थिरावले आहेत.

शनिवारी चांदीचे दर 500 रूपयांनी वाढून 69 हजार 200 रूपये प्रती किलोवर आले होते. आज देखील चांदीचा हाच दर स्थिर आहे. अलिकडे सोन्या चांदीच्या किंमती उतरल्याने लोकांची सोनं चांदी खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली पहायला मिळत आहे.

तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घट पहायला मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण