अबब… सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण!

नवी दिल्ली |  गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढउतार पहायला मिऴत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 12 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामुऴे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्य़ांसाठी आता ही एक चांगली संधी मानली जात आहे.

एमसीक्सवर सोन्या-चांदीच्या एप्रील वायदे किंमतीत मोठी घसरण पहायला मिऴाली आहे. एमसीक्सवर गुरूवारी  सोन्याच्या वायदे किंमतीत 0.52 टक्क्यांची घसरण झाली आहे. एप्रिलच्या सोन्याची वायदे  किंमत 47 हजार 764 रूपये प्रती तोळा इतकी झाली आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या वायदे किंमतीत देखील एमसीक्सवर घसरण पहायला मिऴाली आहे. मार्चच्या चांदीच्या वायदे किंमतीत 1.02 टक्क्यांची घसरण झाली आहे. एमसीक्सवर मार्चच्या चांदीची वायदे किंमत 68 हजार 224 रुपये प्रति किलो एतकी झाली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

‘पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात ‘हा’ शिवसॆना मंत्री’; चित्रा वाघ यांचा धक्कादायक आ.रोप !

ऐकावं ते नवलच! मला नवऱ्याकडे जायचंय म्हणत चिमुरडी ढसाढसा रडली, पहा व्हिडिओ

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची भावूक पोस्ट व्हायरल

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ