मुंबई | अभिनेत्री कंगना रानौतनं सुशांत प्रकरणानंतर बॉलिवूडमधील वाईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं होतं. यामुळे कंगना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तसेच आता कंगनानं मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर सारखं वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यामुळं शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कंगनावर टिका करायला सुरुवात केली होती. यानंतर कंगना आणि शिवसेनेमधील वा.द आता चांगलाच चर्चेत आला आहे.
नुकतंच बीएमसीनं कंगनाचं मुंबईतील कार्यालय अवैध असल्याचं सांगत मोठी कारवाई केली आहे. बीएमसीनं कंगनाच्या अलिशान कार्यालयावर जेसीबी फिरवला आहे. कंगनाच हे कार्यालय 48 कोटींच असल्याचं बोललं जात आहे.
कंगनानं चित्रपट सृष्टीत एक सामान्य अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास अवघ्या 15 वर्षात पार केला आहे. कंगनाला राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. देशातील महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने देखील कंगनाला सन्मानित करण्यात आलं आहे. बॉलीवूड क्वीन कंगनाच्या संपत्तीविषयी आज आपण जाणून घेवूयात.
कंगना एका पिक्चरसाठी जवळपास 11 कोटी रुपये घेते. तसेच कंगना एका जाहिरातीसाठी जवळपास 1 ते 2 कोटी रुपये घेते. कंगनाची वार्षिक कमाई 7.5 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. कंगनाची सर्व कमाई चित्रपट आणि ब्रँड इंडोर्समेंटच्या माध्यमातून होते. कंगनाची संपती 13 दशलक्ष डॉलर म्हणजेच 93 कोटी इतकी आहे.
कंगना रानौतची मुंबई बरोबरच हिमाचल प्रदेश मधील मनालीत देखील अलिशान हवेली आहे. कंगनाच्या मनालीतील हवेलीची किंमत 20 कोटी इतकी आहे. कंगनाचं एक ऑर्गानिक फार्म देखील आहे.
कंगना बॉलिवूड मधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच कंगना बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. कंगनाला लक्झरी कार्सची देखील आवड आहे. कंगनाकडे बीएमडब्ल्यू 7 सिरीज आणि एक मर्सडी बेंझ GLU SUV देखील आहे. कंगनाच्या संपतीमध्ये रिअल इस्टेटचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आरोप सिद्ध झाल्यास अभिनेत्री रिया चक्रवर्तीला होऊ शकते ‘ही’ शिक्षा!
सुशांतसिंग राजपूतच्या मृ.त्यूबाबत ‘या’ वकिलानं केला अत्यंत धक्कादायक खुलासा
सुशांतप्रकरणी मोठी बातमी! भायखळा तुरुंगात रियाची रवानगी होणार
“काहीच पुरावे नसताना रियाला….; कोणताही बाप हे सहन करू शकत नाही”