फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची भाजपकडे मोठी मागणी

पुणे | भाजपने (BJP) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना केंद्रीय राजकारणात खेचले. त्यांना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीवर स्थान मिळाले आहे.

त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे महत्व अधोरेखीत झाले आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले झाले आहेत.

आता अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने (Akhil Bhartiya Brahman Mahasangh) भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक मागणी केली आहे. या मागणीचे पत्र जे. पी. नड्डा यांना प्राप्त झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात विजयाची घौडदौड कायम ठेवतील, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुण्यातून फडणवीसांना लोकसभेची उमेदवारी देईल आणि त्यांच्या नावाची घोषणा करेल, अशी अपेक्षा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने केली आहे.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी अशा स्वरुपाची मागणी केली आहे.

संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत आपण देवेंद्र फडणवीस यांना स्थान दिले, त्याबद्दल अभिनंदन. देवेंंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केले आहे, असे पत्रात म्हंटले आहे.

फडणवीस यांनी फक्त अर्ज भरायचा आहे, त्यांना जिंकविण्याचे काम ब्राम्हण महासंघ करणार आहे, अशी ग्वाही ब्राम्हण महासंघाने केली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर ही परंपरा देवेंद्र फडणवीस पुढे चालवितील, असे ब्राम्हण महासंघ म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बिल्कीस बानो प्रकरणावर ओवैसी संतापले; म्हणाले, ‘नशीब नथुराम गोडसेला तरी…’

कोकणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयची मोठी कारवाई

“शेतकरी विरुद्ध मोदी सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर देशभरात संताप व्यक्त!