टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!

औरंगाबाद | बहुचर्चित टीईटी (Teachers Eligibility Test Scam) घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन कन्यांचे नाव आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

सायबर पोलीस (Cyber Police) आणि परिक्षा परिषदेने (TET) औरंगाबाद जिल्ह्यातील टीईटी परीक्षेत अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अब्दुल सत्तार यांच्या कन्या हिना आणि उजमा यांचे नाव समोर आले होते.

आता आणखी एक नवीन आणि मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून आजतागायत वेतन मिळत आहे. ती अपात्र असून देखील त्यांना गेली पाच वर्षे हे वेतन सुरु आहे.

सत्तार यांची कन्या हिना कौसर अब्दुल सत्तार शेख (Hina Kauar Abdul Sattar Shaikh) हिला 2017 पासून वेतन मिळत आहे. सत्तार यांनी आपल्या मुली अपात्र असल्याची माहिती दिली आहे. तरी देखील तिला वेतन मिळत आहे.

शिक्षण खात्याच्या माहितीनुसार हिना शेख हिने 2017 पासून ते जुलै 2022 पर्यंत पगार उचलला आहे. हिना हिला महिन्याला 40,000 रुपये ऐवढा पगार मिळत आहे. यात विशेष म्हणजे तिचे पिता अब्दुल सत्तार यांनी स्वत: ती अपात्र असल्याची माहिती माध्यमांना दिली.

महत्वाच्या बाचम्या –

‘यांच्या बापजाद्याने कधी 50 कोटी पाहिले नसतील’; खडसे बंडखोरांवर बरसले

“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न