अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका; म्हणाले, पुढील दहा जन्म तुमची…

मुंबई | वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री असलेल्या सत्तारांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत म्हंटले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरात बसून राहिल्याने त्यांची सत्ता गेली.

त्याचबरोबर त्यांनी एक भाकीत देखील केले आहे. पुढील दहा जन्म तुमची सत्ता येणार नाही, असे देखील सत्तार म्हणाले. शिवसेनेने देखील त्यांच्या या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.

घरात बसून राहिल्याने सत्ता गेली. मुख्यमंत्री हे छोटे पद नसते, हे आता त्यांच्या लक्षात आले असेल. तसेच हे कशामुळे झाले? घरात बसल्यामुळे, असा टोला सत्तार यांनी ठाकरेंना लावला.

त्याचवेळी त्यांनी दोन पावले पुढे जाऊन म्हंटले, तुमची सत्ता आता दहा जन्म येणार नाही. तुमची सत्ता येण्याचे स्वप्न पुढील दहा जन्म पूर्ण होणार नाही, हे मी सांगतो, असे देखील सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तार यांच्या या टीकेवर शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना प्रत्युत्तर दिले आहे.

ही सर्व भाकिते म्हणजे कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते, असा प्रकार आहे. त्यामुळे त्यांना उगाचच काव काव करु नये, असे देखील गोऱ्हे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

“देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीने ब्राम्हण म्हणून हिणवले, त्याच ब्राम्हणाने मराठ्यांची…”; तानाजी सावंतांचे वक्तव्य चर्चेत

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहा लाखांचा दंड

“…तर तो भाजपचा निर्णय असेल”; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर आशिष शेलारांची स्पष्टोक्ती

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट

“आम्हाला गद्दार म्हणण्यापूर्वी…”; अजित पवरांना शंभुराज देसाईंचा इशारा