औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. यावेळी बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे तसेच भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
अर्जून खोतकर आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना एक विनंती आहे की, लोकसभा निवडणुकीत एकदा अर्जून बाणाने रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध करू द्या. एक संधी द्या. त्या संधीचं सोनं केलं नाही, तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही, असं शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.
ज्यांनी हनुमान चालिसा लिहिला त्या तुलसीदासांचे नातेवाईक मिश्रा यांनी हात जोडून हनुमान चालिसाचा वापर राजकारणासाठी करू नये अशी विनंती केली. भाजपा खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे, असं अर्जून खोतकर म्हणाले.
भाजपाचं हिंदुत्व खुर्चीचं आहे, बेगडी आहे. लोकांना सांगतात आपल्या राज्यात हनुमान चालिसा वाचायला बंदी आहे. किती खोटं बोलावयचं. मी दररोज दोनदा हनुमान चालिसा वाचतो. राज्यात आणि देशात हनुमान चालिसावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं अर्जून खोतकरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”
“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…”
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका!