कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल

अमरावती | कृषीमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. सध्या मराठवाड्यात त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्यांची भाषणाची स्टाईल सध्या मेळघाटात जोरदार गाजत आहे.

अब्दुल सत्तार यांनी एका शेतकऱ्याच्या घरी साधेपणाने मुक्काम केला आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या घरी जेवण देखील केले आहे. पण रात्री मोठा पाऊस आला आणि त्याने घर गळू लागले.

शेतकऱ्याच्या घराची ही द्यनीय अवस्था सत्तारांना पाहवली नाही आणि त्यांनी तात्काळ दोनही शेतकऱ्यांना आपल्या खर्चाने चांगली घरे बांधून मिळतील, असे आश्वासन दिले.

बोले तैसा चाले, या म्हणीप्रमाणे सकाळी लागलीच जमिनिचे मोजपाप देखील झाले. आणि त्याचवेळी सत्तार यांनी घरांचे भूमिपूजन करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

मेळघाटातील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल (Chunnilal Patel) यांच्या गावी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा पाहूणचार करण्यात आला. तर त्यांनी शेतकरी सुनील धांडे (Sunil Dhande) यांच्या घरी मुक्काम केला.

यावेळी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी देखील सत्तारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या घरांची द्यनीय अवस्था पाहिली आणि त्यांना राहवले नाही. त्यामुळे त्यांनी लागलीच घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांचे दु:ख आणि त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या योजनेंतर्गत कृषीमंत्र्यांच्या दौरा सुरु आहे. बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट साद्राबाडी या गावात पोहोचले.

महत्वाच्या बातम्या –

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर

दाऊदला पकडण्यासाठी एनआयए सज्ज, केली मोठ्या बक्षिसाची घोषणा

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…

पुण्याला कोणी वाली राहिला नाही, या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे रहाणार का? शशी थरुर म्हणाले…