“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?”

चंद्रपूर | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे. आता सरकारच्या या निर्णयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी सडकून टीका केली आहे. ते ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

वाईन हा फळांचा रस आहे असं समर्थन मोठ्या राजकीय नेत्यांनी केलं आहे. मला त्यांना विचारायचंय की ते त्यांच्या घरातल्या बाळाला वाईन पाजतील का?, त्यांच्या घरातील देवाला दारूचा अभिषेक करतील का? दुर्देवाने वेळ आली तर मरणाऱ्या आईच्या मुखी गंगाजलऐवजी वाईन टाकाल का?, असे प्रश्न डॉ. अभय बंग यांनी सरकारमधील मंत्री अन् नेत्यांना केला आहे.

दारू पदार्थच असा की त्याचं व्यसन वाढत जातं. एखाद्या धोकादायक पदार्थाचं व्यापकीकरण करणं, स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं किळस वाटण्यासारखं आहे, असं डॉ. अभय बंग यांनी म्हटलं आहे.

अर्थव्यवस्थेचा असा तुकड्यातुकड्यात विचार करता येतो का? या गटाचा व्यवसाय वाढावा म्हणून आम्ही हा उपाय करतो. स्मशानात मयतीचं सामान विकणाऱ्याचा धंदा वाढावा म्हणून माणसांना मरू देतो का? असा तुकड्यात विचार करता येणार नाही, असंही डॉ. अभय बंग म्हणालेत.

विकतो एक, पितो दुसरा, नुकसान तिसऱ्याचं होतं. असं होतं तेव्हा आपल्याला ते थांबवावं लागतं. अर्थव्यवस्थेला फायदा होतो हे तुम्ही कसं मोजता यावरही अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं.

ढोबळमानाने राज्यातले 2 कोटी पुरुष दारू पितात. पण याचा अर्थ राज्यातले 10 कोटी लोक दारू पित नाहीत. ते दारुच्या दुकानात पाऊलही ठेवत नाहीत. यामध्ये महिलांचा, लहान मुलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा तसंच दारुसेवन न करणाऱ्यांचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातले 50 टक्के पुरुष दारू पित नाहीत. या सगळ्या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं? व्हिजिबिलिटी वाढावी, अक्सेसिबिटिली वाढावी, तुम्ही बाजारात दूध विकत घ्यायला गेलात, कपडे विकत घ्यायला गेलात तरी नजरेला दारूची बाटली पडावी असं एक कुटील कारस्थान आहे, असं बंग यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…

काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय