कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…

मुंबई |  भारतात कोरोना रूग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढते आहेत. वाढती रूग्णसंख्या हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच मराठी बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून त्याने मोदींना सल्ला दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या, अशी विनंती या पत्रातून अभिजीत बिचुकलेने नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

15 वर्षाखालील मुलं ही उद्याच्या भारताचं भविष्य आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवावीत, अशी मागणी बिचुकलेने या पत्रातून केली आहे.

अनेक राज्यात नववी पर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब होतो. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. शाळा सुरु झाल्या तर खेळण्याच्या नादात मुलं सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत. त्यामुळे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल,असंही बिचुकलेने म्हटलं आहे.

 

Abhijeet bichkule letter to PM

 

महत्वाच्या बातम्या-

-…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना

-लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय

-आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली- निलेश राणे

-LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…

-गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक