“सलमान खान अजून अंड्यात आहे, त्याला…”; अभिजीत बिचुकलेनं घेतला नवा पंगा

मुंबई | भारतातील सुप्रसिद्ध शो म्हणून सलमान खानच्या बिग बाॅस या शोला ओळखण्यात येतं. दररोज या शोमधील घटना व्हायरल होत असतात. आता या शो मधील प्रसिद्ध चेहरा अभिजीत बिचुकले बाहेर पडला आहे.

बिग बाॅसचा 15 वा भाग सध्या अनेक कारणांनी प्रचंड गाजत आहे. अनेक कलाकारांच्या शो मधील आणि शो बाहेरील वागणुकीमुळं हा शो सध्या चर्चेत आहे.

राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात आपल्या अभिनय शैलीची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी कलाकार अभिजीत बिचुकले हा देखील बिग बाॅसमध्ये सामिल झाला होता.

बिग बाॅस शो मध्ये गेल्यानंतर बिचुकले चांगलाच चर्चेत होता. सहकलाकारांसोबतच्या वागणुकीमुळे बिचुकलेला मोठ्या प्रसंगाला समोरं जावं लागलं होतं. परिणामी आता बिचुकले या शोमधून बाहेर पडला आहे.

सलमान खान हा या शो चा सादरकर्ता आहे. सलमान खान आणि बिचुकले यांच्यात बिनसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. बिचुकलेनं शो सोडताना सलमानवर जोरदार टीका केली आहे.

सलमान खान अजून अंड्यात आहे त्याला अभिजीत बिचुकले काय आहे अजून कळालेलं नाही. असे 100 सलमान मी गल्ली झाडायला दारात उभे करीन, अशी टीका अभिजीत बिचुकलेनं केली आहे.

वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो चाबूक फिरवत होता. पण वाघ आता बाहेर येतोय, असं बिचुकले म्हणाल्यानं आता वाद वाढण्याची चिन्ह आहेत. बिचुकले बिग बाॅसमध्ये असताना सलमान आणि त्याच्यात वाद होत होते.

दरम्यान, बिग बाॅसमध्ये जाण्याअगोदर देखील अभिजीत बिचुकले अनेकदा राज्यात वादात सापडले होते. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर देखील आता बिचुकलेने टीका केल्यानं आता वाद वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 जनरल बिपीन रावत यांच्यासह ‘या’ तीन दिग्गजांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

 राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राहुलची कर्णधार म्हणून काराकिर्द संपुष्टात?, बीसीसीआय अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य

‘लेडी सेहवाग’चा जलवा बरकरार! पुन्हा जागतिक क्रमवारीत गाठलं अव्वल स्थान

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य