मुंबई | राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरले असल्याने सगळ्यांचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.
महाराष्ट्रात सध्या विधानपरिषद निवडणुकीच चर्चा असून राजकीय नेतेही यातच व्यस्त आहेत. विधानपरिषद निवडणुका तोंडावर असताना बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मात्र राष्ट्रपतीपदाच्या मागे लागले आहेत.
अभिजीत बिचुकले लवकरच राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. इतकंच नाही तर बिचुकले राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तयारीला देखील लागले आहेत.
अभिजीत बिचुकले यांनी नुकतंच एका वृत्तवाहीनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बिचुकले सध्या खासदारांचा पाठिंबा मिळवत आहेत. फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.
मी या निवडणुकीसाठी इच्छूक असून मला ही निवडणुक लढवायची असल्याचं बिचुकले म्हणाले. या अनुषंगाने बिचुकले यांनी तयारी देखील सुरू केली आहे.
या निवडणुकीसाठी मी काही खासदारांचा पाठिंबा मिळवत असल्याचं बिचुकले म्हणाले. तर मी काही दिवसातच निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचा खुलासा देखील बिचुकले यांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बिचुकलेंनी ठरवून दिलेल्या 50 खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले
सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणाऱ्या हॉटेलवाल्याबाबत राजू शेट्टींचा मोठा खुलासा, म्हणाले…
मोठी बातमी! वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आमदारांना नातेवाईक, मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंचा रूग्णालयातील फोटो समोर!
“माझ्या मतदानाचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका; शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही”