“फक्त अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, नाहीतर मला अटक होईल”

सातारा : माझ्या समोर उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असतील तर काय झालं? का नसावेत? लोकशाही आहे. कुणीही उभे राहू द्या, मी उमेदवार आहेच. फक्त अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका. मला अटक होईल, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर भाष्य केलं आहे. त्याबाबत राजेंनी प्रतिक्रिया दिली.

कॉलर उडवणे हा बेशिस्तपणा असेल, तर अनेक भ्रष्टाचार झाले असते, त्यात काही निर्णय झाले नाहीत, ते शिस्तीचं आहे का? कॉलर उडवणे ही माझी स्टाईल आहे. माझी कमिटमेंट शिवाजी महाराजांसारखी लोकांशी राहणार, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

मी कधीच बेशिस्त नव्हतो. प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. कुणी काय विचार करावा हे त्याचं त्यानं ठरवावं. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याची मुभा आहे, असं भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

माझी खंत पवारांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार?, असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –