या पठ्यानं घेतल्या 6 चेंडूत तब्बल 5 विकेट; मैदानावर घातलं धुमशान!

सूरत: भारतीय संघाकडून कसोटी आणि वन डे सामने खेळणाऱ्या कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुननं अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अभिमन्यू मिथुनने एकाच षटकात हरियाणाचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्याच्या या कामगिरीमुळं कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

अभिमन्यू मिथुनने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या चेंडूवर हिमांशू राणा, दुसऱ्या चेंडूवर राहुल तेवतिया, तिसऱ्या चेंडूवर सुमीत कुमार, चौथ्या चेंडूवर अमित मिश्राला आऊट केलं. ओव्हरचा पुढचा बॉल हा वाईड होता, यानंतर पाचव्या बॉलला एक रन गेली आणि सहाव्या बॉलला जयंत यादवची विकेट घेतली.

हरियाणाने पहिले बॅटिंग करताना 194/8 एवढा स्कोअर केला. हिमांशू राणाने 61 रन, चैतन्य विश्णोईने 55 आणि हर्षल पटेलने 34 रन केले. हरियाणाने शेवटच्या षटकात 5 विकेट गमावल्या. कर्नाटकने फक्त 15 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 195 रन केल्या. देवीदत्त पडिकल ८७ रन आणि केएल राहुलने 66 रन तर अभिमन्यू मिथुननं 39 रन देऊन 5 विकेट घेतल्या.

30 वर्षांच्या मिथुनने भारताकडून 4 टेस्ट आणि 5 वनडे मॅचही खेळल्या आहेत. मिथुनने टीम इंडियासाठी 2010 साली पहिली आणि 2011 साली शेवटची मॅच खेळली. यानंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या-