नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेऊन त्यांचा छळ केला होता. त्या पाकिस्तानी लष्कराच्या कमांडोचा खात्मा करत भारताने बदला घेतला आहे. पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्तमानला छळणारा पाकिस्तानी कमांडो अहमद खान याला भारतीय जवानांनी ठार केलं. 17 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने नाक्याल सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताने या गोळीबाराला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात अहमद खान ठार झाला आहे.
बालाकोट कारवाईनंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करताना वर्धमान यांचे विमान 27 फेब्रुवारी रोजी व्याप्त काश्मिरमध्ये कोसळले होते.
विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पाकस्तानी लष्कराने अभिनंनदन यांना पकडण्यात आले होते.
भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली ‘एफ 16’ ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं ‘एफ 16’ हे विमान पाडलं होतं.
पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे ‘मिग 21’ हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या स्वाधीन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???
-“महाराष्ट्र सैनिकांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही”
-राज ठाकरेंना आवडणार नाही असं काहीही करु नका- अविनाश जाधव
-उदयनराजे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच- शिवेंद्रराजे भोसले
-मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला; अभिनेता रणवीर सिंगची कबुली!