Abhishek Ghosalkar Firing In Dahisar l मुंबईतील दहिसर येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना काल घडली आहे. यावेळी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घोसाळकर यांना गोळ्या घालणारा आरोपी मॉरीस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडली. त्याने स्वतःवर चार वेळा गोळी झाडली आणि त्याचाही मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करत हत्या करण्यात आली आहे.
Abhishek Ghosalkar Firing In Dahisar l कोण आहे अभिषेक घोसाळकर? :
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला सामाजिक कार्य सुरू केले होते. यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. दहिसरमध्ये त्यांच्याकडे तरुण आणि उत्साही नेता म्हणून पाहिले जात होते. (Abhishek Ghosalkar Firing In Dahisar)
अभिषेक घोसाळकर यांची अभ्यासू आणि उत्साही नगरसेवक अशी प्रतिमा होती. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक होते. सध्या हा प्रभाग शीतल म्हात्रे यांच्या ताब्यात आहे. (Abhishek Ghosalkar Firing In Dahisar)
https://www.facebook.com/share/p/52PLqhXUdZakLDmT/?mibextid=Zg00Y8
Abhishek Ghosalkar Firing In Dahisar l गोळी झाडणारा मॉरीस भाई कोण? (Who Was Morris Noronha) :
गँगस्टर मॉरिस हा बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई म्हणून प्रसिद्ध आहेत. मॉरीस भाईवर बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर एका महिलेची 88 लाख रुपयांची फसवणूक आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने या महिलेला धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर न्यायालयात जाताना त्यांनी पत्रकारांनाही धमकावले असल्याचे बोलले जात आहे. मॉरिस भाई (Who Was Morris Noronha) यांनी प्रभाग क्रमांक एकमधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. (Who Was Morris Noronha)
News Title : Who Was Morris Noronha
महत्वाच्या बातम्या –
पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा
नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट
आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील
अरे वा…लुना मोपेड लॉन्च! फुल चार्जमध्ये धावणार तब्बल इतके किलोमीटर; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य
अनुपम खेर झाले भावुक…अवघे 37 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि आता…