समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत

पालघर | अरबी समुद्रात सध्या 500 ते 600 नौकांमध्ये सुमारे 1 लाख लोक मच्छीमारी करण्यासाठी गेले आहेत. मात्र, दुर्दैवाने अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह प्रचंड लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचा जीव धोक्यात आला आहे. सकाळ पासून समुद्र किनार्‍यावर महाकाय लाट धडकत आहेत.

सध्याच्या काळात मच्छीमारांच्या संरक्षणासाठी प्रशासनानं तातडीनं पाऊलं उचलणं गरजेच आहे. परंपरागत मच्छीमारांनी कित्येक वर्षांपासून प्रशासनाला 15 मे ते १५ॉॉ15 ऑगस्ट दरम्यान मासेमारी बंदीचे आदेश काढण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनानं नेहमीच या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे नाईलाजाने मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या लोकांचा जीव धोक्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, दांडी, नवापूर, डहाणू, वसई, अर्नाळा, नायगाव तर ठाणे जिल्ह्यातील उत्तन या भागातील  ५०० ते ६०० नौका सध्या समुद्रात अडकल्या आहेत. सकाळपासून वादळी वाऱ्यासह लाटांचा मारा सहन करत हळूहळू काही नौका किनाऱ्याकडे सरकत आहेत.

दरम्यान, दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला आपलं तोंड वर काढल आहे. त्यामुळे अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात लाटा उसळू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मिशन राम मंदिर पु्र्ण आता आता लक्ष्य…; भाजपच्या धडाडीच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनंतर आता विरोधी पक्ष नेत्यालाही झाली कोरोनाची लागण!

मुूंबईमध्ये जोरदार पाऊस; राज्यात दोन दिवस ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा!

राज्यातील आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्देवं म्हणजे नेत्यांनी शब्दही काढला नाही!

अयोध्या निकाल हा तथ्य आणि पुराव्यांवर नाही तर…-प्रकाश आंबेडकर