‘मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला झाली दुखापत 

मुंबई| बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेला पहायला मिळतो. सध्या तो त्याच्या ‘मिशन मजनू’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सिद्धार्थ लखनऊ येथे या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. पण या ‘मिशन मजनू’च्या सेटवरच सिद्धार्थला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘मिशन मजनू’ या आगामी चित्रपटा चित्रपटात सिद्धार्थनं गुप्तहेराची भूमिका साकारली असून यामध्ये अनेक अॅक्शन सिन्स आहेत. दरम्यान या चित्रपटातील एक अॅक्शन सीन करताना सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ ‘मिशन मजनू’ या चित्रपटातील एक अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत होता. सीन शूट करताना उडी मारल्यानंतर सिद्धार्थचा पाय एक मेटलच्या तुकड्यावर जाऊन आदळला. त्यामुळे सिद्धार्थच्या गुडघ्याला दुखापत झाली. पण सिद्धार्थने चित्रीकरण थांबवले नाही. त्याने औषधे घेऊन उर्वरीत सीन शूट केला. तसेच पुढचे तीन दिवस सिद्धार्थ चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे.

‘मिशन मजनू’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग लखनऊ येथे सुरू असून या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

चित्रपटात 1970 पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे.

रश्मिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकानं चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरूवातीला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिने लिहिलं होतं की, ‘मिशन मजनूबद्दल मी पुन्हा एकदा उत्साही आणि अस्वस्थ आहे. मला पदार्पण करत असल्यासारखं वाटत आहे.

भारत आणि पाकिस्तान संबंधावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो अलीकडेच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. यामध्ये चाहत्यांना सिद्धार्थचा हटके लुक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत चालली आहे.

लवकरच सिद्धार्थ ‘शेरशाह’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ दोन भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेत्री कियारा अडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसोबत ‘थँक गॉड’ चित्रपटात तो दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

महत्वाच्या बातम्या – 

अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र…

तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…

तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…

केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…

अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy