Top news देश

प्रियंका गांधींच्या शिष्टाईमुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा; सचिन पायलटांचं बंड शमलं!

जयपूर | मागील काही दिवासांमागे राजस्थानमध्ये चांगलंच राजकीय नाट्य रंगलं होतं. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस विरोधी बंडाचा झेंडा पुकारला होता. पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानध्ये कोण सत्ता गाजवेल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र, आता सचिन पायलट यांची आपल्या घरवापसी झाली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राजस्थानमधील सत्तासंघर्ष चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडला आहे.

सचिन पायलट हे आता काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षाच्या बळकटीसाठी व विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पायलट यांच्या घरवापसीमुळे काँग्रेसला आपला राजस्थानचा गढ राखण्यात यश मिळालं आहे.

दरम्यान, अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवल्यानं सचिन पायलट काँग्रेस पक्षावर चांगलेच नाराज झाले होते. बंडाचा झेंडा उगरात सरकार अस्थिर करण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. मात्र, अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये वापसी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घ्यावी”

…तर सरकारला शॉक देऊ; वाढीव वीज बीलावरून राजू शेट्टी आक्रमक

DTH च्या ग्राहकांना मिळत आहे चार दिवस मोफत टीव्ही पाहण्याची संधी; कसं ते जाणून घ्या!

रणवीर रेपिस्ट तर दीपिका सायको आहे; कंगना रनौत पुन्हा भडकली

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश