भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनकडून अधिकृत निवेदन

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारताने देखील चीनला चोख प्रत्युत्तर देताना चीनच्या 43 सैनिकांना मारलं आहे. या सगळ्या संघर्षानंतर चीनने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनुआने दिलेल्या बातमीनुसार PLA पश्चिम थिएटर कमांडचे प्रवक्ते चांग शुई ली यांच्या अधिकृत व्हिबो अकाऊंटवर एक निवेदन प्रसिद्ध झालं आहे. या निवेदनामध्ये भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि वाद संपुष्टात आणण्यासाठी संवादाचा योग्य मार्ग ठेवावा, असं म्हटलं गेलं आहे. याबाबतचं वृत्त बीबीसी मराठीने दिलं आहे.

चीनने दिलेल्या निवेदनात म्हटलंय, “भारतीय सैनिकांनी आपलं वचन मोडलं आणि पुन्हा एकदा LAC पार केली. चीनच्या सैन्याला त्यांनी जाणून बुजून डिवचलं. तसंच त्यांनी चीनच्या सैन्यावर हल्ला केला. यामध्ये दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला आणि यामुळेच जीवितहानी होऊन दोन्ही देशांचं नुकसान झालं. भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि चर्चेद्वारे हा वाद सोडवावा.”

भारताच्या अधिकृत निवेदनात म्हटलं गेलंय, “भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाखजवळच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातून आपापले सैन्य माघारी बोलावले आहेत. भारतीय लष्कर देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी कटिबद्ध आहे”.

महत्वाच्या बातम्या-

-मुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….

-बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

-सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली लेकीची अवस्था, म्हणाला…

-“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”