मुंबई | महाविकास आघाडी सरकार (MVA Government) सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत आहेत.
आयकर विभाग, सक्तवसूली संचनालय, सीबीआय, या तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीशी संबंधितांवर कारवाई करत आहेत. आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी पहाटे पाचपासून ईडीनं कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
ईडीनं कारवाई करताना सतीश उके आणि त्यांच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. परिणामी राज्यात मोठा राजकीय संघर्ष उद्भवला आहे.
नाना पटोले यांच्या वकीलांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप सतीश उकेंच्या वडीलांनी केला आहे.
सतीश उकेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचीका दाखल केली होती. त्यानंतर कारवाईला सुरूवात होणार हे स्पष्ट होतं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, सतीश उके आणि प्रदिप उके यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यात परत एकदा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”