नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

नाशिक | कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून सर्व काही बंद होतं. शाळा महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाल्याचं पहायला मिळालं आहे.

अशातच आता नाशिकमधील दोन महाविद्यालयीन मुलींमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नाशिकच्या एका कॉलेजच्या आवारातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय.

किरकोळ कारणावरून दोन महाविद्यालयीन मुलींमध्ये वाद पेटला. भांडणं झालेल्या मुली चांगल्या मैत्रिणी होत्या.  हा वाद इतका पेटला की दोघींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका प्रसिद्ध कॉलेजच्या कॅम्पसमधील हा व्हिडीओ आहे. यात दोघी मैत्रिणी एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहेत. काही मिनीटे ही हाणामारी सुरू होती.

या दोघींची भांडणं पाहून काही मुली घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये या मुली काॅलेजच्या युनिफाॅर्ममध्ये दिसत आहेत.

कॉलेजच्या आवारातील अनेकजण बघ्याची भूमिका घेत होते. त्याठिकाणी उभ्या असलेल्या काही तरूणांची या घटनेचा व्हिडीओ काढला आहे.

दरम्यान, एक वृद्ध आजींचा आवाज देखील या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. ‘आरं सोडवा रं त्यांना’, असं आजीबाई म्हणत आहेत. तर दुसरीकडे या घटनेवरून पालकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 ‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई

 “नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा