“अजित पवारांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई केली”

नागपूर | सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी मंत्र्यांपासून ते आमदारापर्यंत ईडी आणि आयकर विभागानं कारवाई केली याविषयी वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी सर्व लोकांवर झालेल्या कारवाईवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी पडलेल्या छाप्याविषयी वक्तव्य केलं . अजित पवारांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई केली. त्यांच्या घरी 20-20 अधिकारी येऊन बसायचे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

पुढे शरद पवार म्हणाले की, मी अधिकाऱ्यांना विचारलं की, तुम्ही पाच-पाच दिवस घरी येऊन बसत आहे. यावर त्यांनी वरुन दिल्लीवरुन आदेश असल्याचं म्हटलं आहे.

राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही, असंही शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यात म्हटलं.

नागपूरात व्यापारी संघटनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी पवारांच्या समोर व्यक्त केल्या आणि पवारांना विनंती केली की त्यांनी या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.

नागपूर दौरा होत असे, तेव्हा अनिल देशमुख सोबत असायचेच. असा एकही दौरा टळला नाही. पण आज अनिल देशमुख आत आहेत. त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत भाजपला आज ना उद्या मोजावी लागेल, असा इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल”

रोहितची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

काँग्रेसला धक्क्यावर धक्के! 4 माजी मंत्री आणि 3 माजी आमदारांनी ठोकला रामराम

अखेर परमबीर सिंह फरार घोषित; आता उरले फक्त 30 दिवस

‘पाकव्याप्त कश्मीरचा ताबा सोडा’; डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानला खडसावलं