Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…

नाशिक | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी सक्तवसूली संचनालयाकडून (ED) अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात आता नवीन घडामोडी घडत आहे.

नवाब मलिक यांचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या भंगार व्यावसायिकांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे.

नवाब मलिक यांना मुंबईमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता व्यवहारात हात असल्याचा आरोप करत ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

नवाब मलिक यांनी भंगार व्यवसायिकांना सोबत घेऊन दाऊदशी संबंधित मालमत्तांचा व्यवहार केल्याचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे.

मलिक यांच्या व्यवहाराच्या संबंधित काही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर ईडीकडून नाशिकमध्ये अचानक धाडसत्र राबवण्यात आलं. परिणामी नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

नाशिकमध्ये अंबड परिसरात भंगार व्यवसायिकांची दुकानं आहेत. येथील व्यापाऱ्यांचा थेट मलिकांशी संबंध आहे, असा संशय ईडीला आहे.

येथील व्यापाऱ्यांनी मलिकांसोबत व्यवहार देखील केल्याचं समोर येत आहे. परिणामी आता मुंबईतील भंगार व्यवसायिकानंतर नाशिकमधील व्यवसायिक अडचणीत आले आहेत.

नाशिकमधील कारवाईबाबत ईडीसोबतच स्थानिक प्रशासनानेदेखील मौन बाळगले आहे. नाशिक भागात कारवाई होत असताना पोलिसांना देखील माहिती नसल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, इक्बाल कासकर, हसीना पारकर यांच्यासोबत मलिकांचे संबंध असल्याच्या आरोपांवरून सध्या मलिकांना ईडीनं अटक केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”

 आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय! 

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा