Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीसह महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पहिल्यापासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे.

सुशांत प्रकरणी अनेक लोकांनी रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. सुशांतच्या कुटुंबाने देखील सुशांतच्या मृ.त्यूला रिया चक्रवर्तीच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं एनसीबी याप्रकरणी तपास करत आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली होती. काही दिवसांपूर्वीच रियाला जामीन मिळाला आहे. रियाला जामीन मिळताच रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियावर खोटे आरोप करत ज्यांनी तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता रिया चक्रवर्ती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे विरुद्ध कारवाई करणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.

मात्र, रिया चक्रवर्ती किंवा तिच्या वकिलांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे या चर्चेमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसांतच समोर येईल. अंकिता लोखंडेनंही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुशांत प्रकरणी अंकिता लोखंडेनं आपण सुशांतच्या परिवाराच्या बाजूने असल्याचं म्हटलं होतं. सुशांतच्या कुटुंबाकडे रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत माझा पाठिंबा त्यांना असेल, असं अंकितानं म्हटलं होतं.

दरम्यान, सुशांतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. सुरुवातीपासून दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. यामुळे सीबीआय सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृ.त्यूशी संबंध आहे का याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे.

सीबीआयनं सुशांतच्या मृ.त्युचा तपास दिशाच्या अँगलनं सुरू केला आहे. याच तपासासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिशाचा कथित प्रियकर रोहन रॉय याच्या घरी धाड टाकली आहे. सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यू प्रकरणी शोध घेण्यासाठी सीबीआयनं दिशाच्या जवळच्या लोकांची चौकशी केली आहे.

सीबीआय सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणी अंतिम सत्य काय समोर येतंय, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केबीसी’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, जी पाहून अमिताभ बच्चन सुद्धा चकित झाले!

अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात

‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण

भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…