मुंबई| नव्वदच्या दशकापासून एक अभिनेता अनेक चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करत होता. चित्रपट सृष्टीत त्यांची ओळख महानायक म्हणून होऊ लागली. या महानायकाचे नाव आहे अमिताभ बच्चन.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आणि आताही सत्याहत्तर वर्षांचे असतानाही उत्स्फूर्तपणे आपले काम करत आहे. बॉलिवूडमध्ये येणारे प्रत्येक कलाकार त्यांना आपला आदर्श म्हणून समोर ठेवतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. या माध्यमातून ते सतत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
‘शराबी’ या सिनेमाचा हा किस्सा कदाचितच तुम्ही वाचला नसावा. या सिनेमातील एक गोष्ट तुम्ही कदाचित नोट केली असेल. ती म्हणजे, अख्ख्या सिनेमात अमिताभ यांचा डावा हात त्यांच्या पँटच्या खिशात आहे. प्रेक्षकांना, चाहत्यांना ही अमिताभ यांची स्टाईल वाटली. त्यापाठीमागचा रोमांचकारक किस्सा त्यांनी स्वतः पोस्ट करत सांगितला आहे.
शराबी चित्रपटात अमिताभ यांचा हात बऱ्याच वेळा त्यांच्या खिशात आहे. त्याचं कारण म्हणजे सेट वर त्यांच्यासोबत घडलेला अपघात. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिवाळीचे फटाके फोडण्यात येत होते. त्यात अमिताभ देखील फटाके फोडताना दिसणार होते.
परंतु, अमिताभ यांनी हातात धरलेला फटका त्यांच्या हातातच फुटला आणि त्यांच्या हाताला मोठी इजा झाली. त्यांचा हात बहुतांश भाजला गेला. परंतु, तरीही त्यांनी चित्रीकरण सुरू ठेवलं. त्यानंतर ते चित्रीकरणादरम्यान एक हात खिशात ठेवू लागले.
‘सिनेमात तू एका बिघडलेल्या दारूड्या मुलाची मुलाची भूमिका साकारणार आहेस. त्यामुळे तुझा हात तू खिशात घाल,’ असे प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना सुचवले आणि अमिताभ यांनी तेच केले. हात लपला आणि हा जाणीवपूर्वक खिशात लपवलेला हातच अमिताभ यांची स्टाईल बनला. चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर लोकांना ही स्टाईल इतकी आवडली की, लोक या स्टाईलच्या प्रेमात पडले.
अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांच्या भूमिका असणारा ‘शराबी’ हा चित्रपट हॉलीवूड मधील ‘ऑर्थर’ या चित्रपटावर आधारित आहे. याचा हिंदी रिमेक शराबी लोकांना इतका आवडला की त्याचा तमिळ रिमेकसुद्धा तयार करण्यात आला होता. त्याचं नाव ‘थंडा कनिके’ असं होतं.
या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया प्रदा, प्राण आणि ओम प्रकाश या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘शराबी’ या चित्रपटाचा समावेश देखील अमिताभ यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झाला.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित झुंड चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील त्यांनी शेअर केले होते. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे अमिताभ यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांचे त्यांच्या या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सूक असलेले पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
अभिनेत्री प्रियंका चोप्रा विमानात पिली होती दारु अन्…,…
शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…
‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…