Top news

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता

Kiran Mane

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. याचमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो, असं किरण माने म्हणालेत.

बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो. तुम्ही फेसबुकवर शोधलं,  #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील, असं ते म्हणाले.

ज्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन त्यातील विद्रोही विचारांची उकल मी आज्या परिस्थितीशी जोडून केलेली आहे. त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, ज्या विचारधारेनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं ज्ञानोबांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला. त्या विचारधारेचे लोक पेटून उठतात. मला खूप त्रास झाला या ट्रोलर्सचा, असं माने म्हणाले.

तुम्ही तुमचं मत मांडायचं नाही, नाहीतर बघा आम्ही काय करु तुम्हाला, हे किती दिवस आपण सहन करायचं? हे प्रत्येक नागरिकानं आता स्वत: ठरवायचं आहे, असंही ते म्हणालेत.

तुम्ही बोलायचं काय यावर बंधन, तुम्ही खायचं काय यावर बंधन, तुम्ही कपडे कुठले घालायचे यावर बंधन, तुमच्या सगळ्याच गोष्टींवर जर बंधनं यायला लागली, असं त्यांनी सांगितलं.

मला बाकी काही म्हणायचं नाही पण ही झुंडशाही किती दिवस सहन करायची? आपण महाराष्ट्रात राहतो, यूपी किंवा बिहारमध्ये राहत नाही, असं माने म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या –

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक