‘The Kashmir Files’वर अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुणे | नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘The Kashmir Files’ सध्या देशभर चर्चेचा विषय बनतोय. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली जात आहे.

काश्मिरी पंडितांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय बनला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे.

अशातच आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर आपलं मत व्यक्त केलं आहे. पुण्यातील लवळे येथील सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये नाना पाटेकर बोलत होते.

एखाद्या चित्रपटावरून काँट्रोव्हर्सी होणं योग्य नाही. हा तेढ कोणता समाज निर्माण करत नाही. चित्रपटामुळे दोन मतांचे गट निर्माण झाले आहेत. त्यावर नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

ज्या व्यक्ती अशा पद्धतीने तेढ उसळवतात त्यांना प्रश्न विचारायला हवेत. सगळे सलोख्यानं राहत असताना मध्येच बिबा घालणं योग्य नसल्याचं देखील नानांनी यावेळी सांगितलं.

आधी चित्रपट पाहा.., त्यातील वस्तुस्थिती कोणाला पटेल असतील, कोणाला पटणार नाही. त्यामुळे गट पडणं साहजिकच असणार असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला के सगळे लगेच भारतीय होतो. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचं, असा सल्ला देखील नाना पाटेकर यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Stock Market: शेअर बाजारात गुंतवणूक करताय?, तुमच्या पोर्टफोलिओत ‘हे’ 5 शेअर्स आहेत का?

 सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा

अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल 

बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल! 

“‘द कश्मीर फाइल्स’चं काय, ‘ठाकरे’ सिनेमाही आम्ही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नव्हता”