अभिनेते प्रेम चोप्रा लिलावती रूग्णालयात दाखल, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई |  मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना (Corona) रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच आता बॉलिवूड (Bollywood) देखील कोरोनाच्या विळख्यात सापड्याचं दिसतंय.

नुकतीच अभिनेत्री एकता कपूर, जॉन अब्राहम, प्रिया रुंचाल, डेलनाज इराण यांनाही सोमवारीच कोरोना झाल्याची माहिती मिळाली होती. अशातच आता बाॅलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांचं वय 86 वर्ष आहे. प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली. दोघांनाही उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय 23 सप्टेंबर 1935 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या प्रेम चोप्रा यांनी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका बजावली आहे. आपल्या अभिनयानं त्यांनी अनेक लोकांना घाबरवलं.

परंतु वास्तविक जीवनात ते अगदी सामान्य आहेत. अलीकडेच त्यांनी यशराजच्या बंटी और बबली 2 या चित्रपटात काम केलं होतं.

दरम्यान, प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा, अशी प्रार्थना सध्या त्यांचे चाहते करताना दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून कोरोनाने बाॅलिवूडमध्ये हाहाकार माजवला आहे. अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर, एकता कपूर आणि जाॅन अब्राहिम याला देखील कोरोनाची बाधा झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ एका गोष्टीमुळे सनी लिओनीला आजही होतोय त्रास, केला मोठा खुलासा

मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार