मुंबई | सध्या सगळीकडे एक सकारात्मक आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण सगळ्यांचा लाडका गणेशा आणि वर्षातला सर्वात मोठा सण गणेशोत्सव जवळ आला आहे.
सगळ्यांच्या घरात आवरा-आवरी, सजावटीची कामं सुरू झाली आहेत. तसेच सगळीकडंच प्रदुषण वाढत चाललं आहे. त्यामध्ये ध्वनी प्रदुषण असो नाहीतर जल प्रदुषण. या सगळ्याची म्हणजेच विशेषत: निसर्गाची काळजी घेण्यासाठी सगळे नागरिक सतर्क झाले आहेत.
त्यामुळे गणेशाची मूर्तीही इको फ्रेंडली बाजारात विकण्यासाठी आलेल्या आपण पाहिल्या असतील. काहीजण एक छंद म्हणून आपल्या घरातल्या गणेशाची मूर्ती आपल्याच हातानं बनवतं आहेत.
ती बनवत असताना अनेकजण त्यासोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे. अशातच मराठी अभिनेता शरद केळकरही आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो.
अशातच त्यानं एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ दुसरा-तिसरा कशाचा नसून, गणेशाची मूर्ती तयार करतानाचा असल्याचं समजतं आहे.
शरद केळकरने अवघ्या काही वेळातच इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवली आहे. या व्हिडीओमध्ये शरदला गणेशाची मूर्ती बनवण्यासाठी म्हणजेच ती कशी बनवायची हे सांगण्यासाठी एक व्यक्ती असल्याचंही दिसतं आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना शरदने एक छानस कॅप्शनही लिहिलं आहे. त्यामध्ये त्यानी आपणही आपल्या घरी सळू मातीची गणेशाची मूर्ती बनवा. या एका पाऊलानं आपण पर्यावरणाला जोपायण्याचे प्रयत्न करू शकतो गणपणी बाप्पा मोरया, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवरीचा आपल्या दिरांसोबतचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ
कौतुकास्पद! तब्बल नऊ तास प्लँक करून तरूणाने केला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा व्हिडीओ
मोबाईल नंबर मागितला म्हणून तरूणीने तरूणासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
ऐकावं ते नवलंच! चक्क बदक माणसांप्रमाणे बोलतोय, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ
कोब्राची शेपटी धरायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ