मुंबई | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काल गुरूवार 2 सप्टेंबर रोजी अकाली निधन झालं आहे. त्याच्या या बातमीमुळे सामन्य जनतेपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
सिद्धार्थ शुक्लावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्धार्थचं पार्थिव आज त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहिती नूसार त्याच्यावर होणारे अंत्यसंस्कार साधारण नऊ वाजताच्या सुमारास होणार असल्याचं समजतं आहे.
ब्रम्हकुमारी कार्यालयात सिद्धार्थचं पार्थिव नेण्यात येणार असून, त्या ठिकाणी पूजा-पाठ होणार आहे. ते झाल्यानंतर त्याचं पार्थिव अंत्यसंस्काचा विधी करण्यासाठी त्याच्या घरी नेण्यात येणार आहे.
तसेच सिद्धार्थचं घर ओशिवरामध्ये आहे. त्यामुळे ओशिवरामधील वैकुंठभूमी या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं कळालं आहे.
सिद्धर्थच्या निधनानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर आकाऊंटवरून त्याचा फोटो शेअर करून त्याच्या व्यक्तीमत्वाबद्दल लिहिलं आहे. तर काही कलाकारांनी तो एक माणूस म्हणून कसा होता हेही लिहिलं आहे.
1 सप्टेंबरच्या रात्री सिद्धार्थ काही औषधं खाऊन झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकळी तो उठू शकला नाही. हे कळाताच त्याच्या घरच्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आला असल्यानं झाला असल्याचं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ
काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर
जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम