मुंबई | काल 2 सप्टेंबर रोजी बिग बॉस फेम अभिनेता आणि मॉडल सिध्दार्थ शुक्लाचं काल अकाली निधन झालं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
मृत्यूच्या आधल्या दिवसाच्या रात्री सिद्धार्थने काही औषध घेतली होती. त्यानंतर झोपायला गेला. मात्र दुसऱ्या तो उठू शकला नाही. हे लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला मुंबईमधील कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर मृत घोषित केले.
तसेच सिद्धार्थचा मृत्यू त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यानं झाला असल्याचंही सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलेल्या कारणामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की एवढा फिट दिसणाऱ्या सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो. सिद्धार्थची कोणी हत्या तर केली नसेल ना, अशा अनेक चर्चांना सध्या सगळीकडे उधाण आलं आहे.
परंतू आता या चर्चांना कायमचा पूर्णविराम लागणार असल्याचं समजतं आहे. अखेर सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या आला आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या मृत्यू मागचं खर कारण सर्वांना कळेल.
परंतू अद्याप पोलिसांच्या हाती आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नक्की काय लिहिले आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे सिद्धार्थचा मृत्यू झाला आहे. हे कळालेलं नाही.
दरम्यान, सिद्धार्थचं पार्थिव आज त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्धार्थवर त्याच्या राहत्या घराजवळील वैकुंठभूमी या ठिकाणी अंत्यस्कार होणार असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार
चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ
काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर
जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम