मुंबई| लाॅकडाऊन काळात गरजूंचा मसीहा बनलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. त्यानं लाॅकडाऊन काळात अनेक गरिब लोकांची वेगवेगळ्या मार्गानं मदत केली. एवढंच नाही तर अजूनही तो मदतीचा हात पुढे सरसावताना दिसतो. कोणाला कधाही काहीही गरज लागली तर तो त्याच्या मदतीसाठी नेहमी हाजीर असलेला पहायला मिळतो.
अशात आता कोरोना काळात गरजूंना मदत करणारा सुपरहिरो सोनू सूद यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूदने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यात लिहिले की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.. मी तुमच्यासोबत आहे.
सोनु सूदच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका तासात सोनु सूदच्या ट्विटला 28 हजार लाईक्स आले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोना झाला होता.
2020 या वर्षात सर्वांनीच अनेक संकटांचा सामना केला. कोरोना व्हायरसचा फटका सर्व सामान्य जनतेपासून मोठ्या सेलिब्रिटींना देखील बसला. या महामारीच्या काळात प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. पण अभिनेता सोनू सूदने मात्र अनेकांची मदत केली. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमीका साकारणार सोनू कोरोना काळात मात्र सामान्य जनतेसाठी हिरो ठरला.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, गोविंदा यांना कोरोनाची लागण झाली होती. आता सोनू सूदची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘सुशांतसारखं कार्तिकलाही फासावर जाण्यास भाग पाडू…
‘तो’ फोटो शेअर करत कंगना रणौतनं महाराष्ट्रातील…
फक्त 10 मिनिटं भेटशील का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…