Top news पुणे महाराष्ट्र राजकारण

‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश दिलाय’, अभिनेता सुबोध भावेचं मोठं वक्तव्य

Subodh Bhave

पुणे | राज्यातील राजकीय घडामोडींवर राज्यभरातील नेते, विचारवंत, पत्रकार आणि लेखक आपले बहुमुल्य मत ठेवत आहेत. त्यात आता पुण्यातील एका समारंभात बोलताना अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी देखील भाष्य केले आहे.

पालक आणि विद्यार्थी म्हणून आपण सर्व वैयक्तिक विकासाच्यामागे धावत आहोत. यावेळी आपण अजानतेपणे लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचे काम दिले आहे, असे स्पष्ट आणि परखड मत सुबोध भावे यांनी व्यक्त केलं आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) वतीने डीईएस प्री प्रायमरी स्कूल मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजिक एका समारंभात ते बोलत होते.

‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याचा शोध घेणाऱ्या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भावे तेथे प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. यावेळी 250 विद्यार्थ्यांचा सहभाग असणारी नाटीका (Drama) सादर करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भावे म्हणाले, सध्याच्या स्थितीत जो तो चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावतोय, परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पहातोय. परंतु आपल्या अशा विचारांमुळे ज्या लोकांची लायकी नाही असे लोक राजकारणात देशाची पायाभरणी करण्यासाठी येत आहेत.

देश निर्मितीसाठी पुढील पिढ्यांमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, असे म्हणत त्यांनी शिक्षण पद्धतीकडून आपल्या अपेक्षा बोलून दाखविल्या. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काय होते? हे आता आपण सर्व पाहात आहोत, असे देखील भावे म्हणाले.

इंग्रजांनी (British) भारतात नोकरदार तयार व्हावे याकरीता आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आणि आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले तर मुंबईत (Mumbai) पैसा रहाणार नाही, अशा प्रकारची वक्तव्ये करण्यास राजकारणी धजावतात, अशी टीकाही सुबोध भावे यांनी यावेळी केली.

आपण आजच्या काळात मुलांना चित्रपटातील गाणी आणि संवाद म्हणायला सांगतो. ते चुकीचे आहे. पुष्पा चित्रपटाच्या संवादाचे तर खूळच आले आहे. हे करुन देश घडणार नाही. त्यापेक्षा मुलांना जर राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल, असे यावेळी भावे आपल्या भाषणात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ

‘चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्या, मग बघू…’, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान

फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक

‘संजय राऊतांनंतर आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा नंबर’, रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ