अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याचे मित्रही घरी उपस्थित होते.

बराच वेळ सुशांत आपल्या रुममधून बाहेर आला नाही. मित्रांनी खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद आला नाही.

शेवटी दरवाजा तोडून मित्रांनी आत प्रवेश केला असता सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. यानंतर वांद्रे पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली.

वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा योग्यरित्या जतन केला गेला नाही, हे निष्काळजीपणा आहे. कूपर हॉस्पिटलने सुशांत सिंगच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी केलेली नाही, असंही तक्रारीमध्ये म्हटलंय.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे शवविच्छेदन घाईघाईत करण्यात आले. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टममध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या टीमवर दबाव आणला, असा आरोप करण्यात आला आहे.

मृतदेहाच्या शवविच्छेदनादरम्यान दोन्ही प्रशासन आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे या प्रकरणात दिसून येते. अभिनेता सुशांतच्या दिवंगत मृतदेहाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केलं गेलं नाही, आदि आरोप तक्रारीमध्ये करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो” 

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

पुण्यातील डॉक्टरने लेकीच्या लग्नाचा खर्च वाचवत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारलं घर! 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा झाली आई; सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन 

‘ही’ लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा; Omicron ची 14 लक्षणं समोर