Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट

मुंबई| सुशांतच्या मृ.त्युला पाच महिने उलटुन गेले तरी देखील सुशांतचे चाहते त्याला विसरले नाहीत. तसेच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही त्याला अद्याप विसरलेली नाही. ती देखील सतत त्याच्या आठवणीत सोशल मीडियावर काही न काही पोस्ट करत आहे.

अनेक वर्ष सुशांत आणि अंकिता रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव या दोघांचा ब्रेकअप झाला होता. सुशांतच्या मृ.त्यूने अंकितालाही चांगलाच धक्का बसला होता.

अशातच आता अशी बातमी समोर येत आहे की, अंकिता लवकरच सुशांतला एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये श्र.द्धांजली अर्पण करणार आहे. परंतु याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

हा कार्यक्रम त्याच वाहिनीवर प्रसारित होईल जो एकेकाळी अंकिता आणि सुशांतची ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रसारित करत होता. हा कार्यक्रम केव्हा प्रसारित होईल याबद्दल अद्याप कोणतंही अधिकृत वृत्त समोर आलं नाही.

दरम्यान, सुशांतसिंग राजपूत अंकिता लोखंडेला बरेच दिवस डेट करत होता. या दोघांचीही लव्ह स्टोरी खूप रंजक होती. एका फ्रेममध्ये ते दोघे जणू एकमेकांसाठी बनवलेले आहेत असं दिसत होते. हे दोघे प्रत्येक आनंदात आणि दु: खामध्ये एकमेकांच्या सोबत दिसायचे.

तसेच सुशांत आणि अंकिता सोनी टीव्हीवरील एका शोमध्ये देखील एकत्र दिसले होते. या रिअॅलिटी शोमध्ये दोघेही जोडप्याच्या रूपात पोहोचले होते. या स्टेजवर सुशांतसिंग राजपूतने अंकिता लोखंडेला अतिशय रोमँटिक पध्दतीने प्रपोज केले होते.

सुशांतने 2011 मध्ये अंकिताला प्रपोज केले आणि अंकिताने त्याचा हसत हसत स्वीकार केला होते. दोघेही बराच काळ लव्ह लाईफ जगत राहिले. मात्र, काही कारणास्तव या दोघांच्या नात्यात दरार आली आणि हे प्रेमळ जोडपं विभक्त झालं.

चाहत्यांना आशा होती की हे दोघे लग्न करतील. मात्र, तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. जेव्हा एखादं जोडपं इतक्या वर्षांनंतर ब्रेकअप करते तेव्हा दुखावलं जातं. सुशांत आणि अंकिता देखील ब्रेकअप नंतर बरेच दिवस दु:खी होते.

महत्त्वाच्या बातम्या-

एकीकडे पत्नी प्रेग्नंट तर दुसरीकडे सैफ अलीच्या मुलासाठी येत आहेत लग्नाचे प्रस्ताव

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यामुळे आरोह वेलणकर आणि महेश टिळेकर भिडले, एकमेकांवर टीका करत म्हणाले…

…म्हणून आमीर खान अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा! कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

‘या’ बड्या अभिनेत्रीवर आधी चाकूने ह.ल्ला आता जीवे मा.रण्याची धमकी, अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी साद

मोठी बातमी! कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष ‘या’ प्रकरणी गजाआड