अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

मुंबई| हिंदी टीव्हीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे काल हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनामुळे हिनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 20 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही कामानिमित्त हिना काश्मीरला गेली होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच ती मुंबईकडे रवाना झाली आहे.

हिनाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि जवळच्या व्यक्तींपैकी तिचे वडिल एक होते. ती सतत आपल्या सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. यामध्ये त्यांच्यातील प्रेम नेहमीच दिसून येत होतं. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी आपल्या कौटुंबिक गोष्टी शेअर करत असते. वडिलांच्या निधनाने हिनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हिना खानच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे’ अशी माहिती विरल भय्यानीने दिली आहे.

वडिलांच्या अचानक जाण्यानं हिना खानला मोठा धक्का बसला आहे. हिनासाठी सध्या हा खूपच कठीण काळ आहे. ही माहिती समजताच सर्वजण हिना आणि हिनाच्या कुटुंबाला हे सहन करण्याची ताकत मिळावी अशीच प्रार्थना करत आहेत.

हिना बऱ्याच वेळा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती काही दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत मालदिव्जला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती.

‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतून हिना घराघरांत पोहोचली. हिनाचं सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडला नव्हता. परंतु तिची प्रगती पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं, असं हिना नेहमी सांगते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने…

‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

‘उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद’ प्रिया बापटच्या…

युजवेंद्र चहलला पहिली विकेट मिळताच पत्नि धनश्रीला अश्रू…