मुंबई : भारतीय प्रेक्षकांच्या मनावर ज्या अभिनेत्रीने आयुष्यभर अधिराज्य गाजवलं आणि जाता क्षणी साऱ्यांना भावूक करून गेली ते नाव म्हणजे श्रीदेवी. आज तीचा 56 वा वाढदिवस. तिचे चाहते तिच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत. त्याचबरोबर तिचे कुटुंबिय देखील तिच्या आठवणीने भावूक झाले आहेत. तिची मुलगी जान्हवी हिने तिच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट केलं आहे.
जान्हवी कपूरने श्रीदेवीचा फोटो शेयर करत ‘आई माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…’ असं ट्वीट केलं आहे.तर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनीही वाढदिवसानिमीत्त भावूक होऊन ‘तु आम्हाला प्रत्येक क्षणी आठवतेस आणि तू आमच्या सोबत अनंत काळापर्यंत राहशील’ असं ट्वीट केलं आहे.
श्रीदेवींनी त्यांच्या बॅालिवूडधील कारकिर्दीने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी तामिळ, तेलगू , मल्याळम आणि कन्नड भाषेमध्येही काम केले आहे.
श्रीदेवींनी केलेले अनेक चित्रपट अजरामर झाले आहेत. नगिना, मि. इंडिया, मॉम, हिम्मतवाला, चालबाज, जुदाई अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
अनिल कपूर यांनीही श्रीदेवींची आठवण काढत ‘तुझ्या जाण्याची खूप खंत आहे. पण, तू आमच्या आठवणीत कायम राहशील. आम्हाला तुझी खूप आठवण येते, असं ट्वीट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठमोळ्या क्रिकेटपटूची पूरग्रस्तांसाना मदत; इतरांनाही केलं मदतीचं आवाहन!
-“तुमच्याकडे जय श्रीराम, तर आमच्याकडे सिताराम”
-बीग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेंना मिळाली नियमभंगाची शिक्षा
-काश्मीरच्या राज्यपालांनी दिलेलं ‘ते’ आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं
-“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”