अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अभिनेत्री कंगना राणौतचा निशाणा, म्हणाली….

मुंबई| नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. कंगना तिच्या बेधडक, वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगनाच्या नव्या ट्विटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यामुळे अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशात अभिनेत्री कंगना राणौतने अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी आता आपला राजीनामा सादर केला आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. या घटनेवर ट्वीट करत कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

एका ट्विटर युझरने कंगनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणते, ‘आज माझं घर तुटलंय उद्या तुझा अहंकार तुटेल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी एकसारखं फिरत नाही.’ या ट्वीटला रिट्वीट करत तिने लिहिलं, ‘जे साधूंची हत्या करतात आणि एका स्त्रीचा अपमान करतात त्यांचा सर्वनाश निश्चित आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पाहत राहा अजून काय काय होतंय.’

या ट्वीटसोबत कंगनाने अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची नावंदेखील लिहिली आहेत. तिच्या या ट्वीटला हजारो रिट्वीट आले आहेत.

कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020 मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळेच आता राजीनामा दिल्यानंतर कंगनाने अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नुकताच मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी 100 कोटी हफ्तावसुली करण्याचा गंभीर आरोप लावला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करीत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. ज्यानंतर इतकचं नाही सीबीआयला कोर्टाने आदेश दिला आहे की, त्यांनी 15 दिवसांच्या आत प्राथमिक रिपोर्ट सादर करावा आणि त्यांच्या तपासात काही तथ्य समोर आले तर पुढील कारवाई करा.

यावर अनिल देशमुख यांनी स्वतःहून आपला राजीनामा सादर केला आणि गृहमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखसाठी खूप मोठा झटका आहे. या कारणास्तव आता महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘त्याचा हात माझ्या पँटमध्ये होता’,…

चक्क तरूणाने केलं आपल्या मावशीसोबत लग्न, वाचा काय आहे प्रकरण

अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर सेटवर घडायच्या…

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीने खाल्ला आपल्या…

‘राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार’;…