अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र होतेय चर्चा, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई| भारतात कोरोनाची दूसरी लाट आल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. या लाटेत लहानांपासून तर वृद्धांंपर्यंत नागरिक बाधित होताना दिसत आहेेत. देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे समोर आहे. गोविंदा, अक्षय कुमार, विकी कौशल, आलिया भट्ट, कतरिना कैफ, परेश रावल, भूमी पडणेकर अशा अनेक कलाकरांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सर्वचजण आता योग्य ती काळजी घेत आहे. अशात बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानने तोंडला लावलेल्या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोविडच्या नियमांचे योग्य पालन करावे असे सेलिब्रेटी चाहत्यांना आवाहन करत आहेत. नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खाननेही चाहत्यांना कोरोनासदर्भात एक आवाहन केले आहे. पण यात तिचा मास्कच जास्त चर्चेत आला आहे.

अभिनेत्री करिना कपूर ने सोशल मीडियावर मास्क घालून फोटो शेअर केला आहे. तसेच ”कोणत्याही प्रकारचा प्रचार नाहिये,फक्त मास्क घाला” असं कॅप्शन लिहून लोकांना मास्क घालण्यासाठी आवाहन देखिल केलय.

या फोटोमध्ये करीनाने वापरलेल्या या काळ्या मास्कची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हे मास्क दिसायला अगदी साधे असले तरी त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल. दिसायला हा मास्क अगदी साधा वाटत असला तरी त्याची किंमत मात्र हजारांमध्ये आहे.

तिचे आवाहन ऐकत तिला समर्थन देणा-या काँमेंट केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी करिनाला तिने घातलेल्या मास्कची किंमत किती असा प्रश्न विचारला आहे.  काही चौकस नेटक-यांनी करिनाने घातलेला मास्क नेमका कोणता आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी हा मास्क LV कंपनीचा आहे. त्या साईटवर या मास्कची किंमत 355$ म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 25 हजार 994 रुपये इतकी आहे!!! हा मास्क एका सिल्क पाऊचमध्ये असतो.

सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत असते. त्यांनी केलेल्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतो. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री करिना कपूर खानने घातलेल्या मास्कची जोरदार चर्चा चालू आहे.

दरम्यान,  अलीकडेच करीना कपूर शूटसाठी सेटवर दिसली होती. करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती आमीर खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…

तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…

केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…

अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…

मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy