मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच अडचणीच सापडलेली पहायला मिळत आहे.
शरद पवारांवर केलेल्या या वादग्रस्त पोस्टविषयी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर तिला कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.
18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. केतळी चितळे हिला शनिवारी रात्री कळंबोली पोलिसांनी अटक केली होती.
केतकीनं केलेल्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे केतकीला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी राहणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
ती पोस्ट मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का?, असा सवाल यावेळी केतकीनं विचारला आहे.
केतकी चितळेवर आता पुढे आणखी कोणते गुन्हे दाखल होणार आणि याप्रकरण पुढे काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे…”
“सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का?”
जगासमोर आणखी एक नवं संकट?; नासाने दिला ‘हा’ इशारा
“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता”
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर