मुंबई| बॉलिवूडची ‘दिलबर गर्ल’ अभिनेत्री नोरा फतेही तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये तिने डान्स करत चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे. नुकताच तिचा आणि अभिनेत्री माधुरीचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्या डान्सच्या जादूने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या नोरा फतेहीने आजवर अनेक जबरदस्त परफॉर्मन्स दिले आहेत. नुकतीत नोराने ‘डान्स दीवाने-3’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नोरासोबतच धकधक गर्ल माधुरीनेदेखील ‘दिलबर’ या लोकप्रिय गाण्यावर ठुमके लगावले.
नोरा आणि माधुरीच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 64 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
‘दिलबर’ या गाण्याला चाहत्यांची कायम पसंती मिळताना पाहायला मिळतं. ‘डान्स दीवाने-3’ च्या मंचावर नोराने या गाण्यावर ठुमके लगावले. यावेळी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीलाही मोह आवरला नाही. दोघींनी एकत्र येत ‘दिलबर’ गाण्यावर डान्स केला.
या व्हिडीओमध्ये माधुरी नोरा सोबत डान्स स्टेप करताना दिसत आहेत. नोराचे गाजलेले गाणे ‘दिलबर’ यावर त्यांनी स्टेप केली आहे. माधुरीसोबत डान्स स्टेप करताना नोराच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत आहे. माधुरीसोबत डान्स करायला मिळणे ही प्रत्येकाची इच्छाच असते. नोराला ही संधी मिळाली आणि तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद स्पष्टपणे व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओत नोराने सिल्वर शिमर बॉडीकॉन ड्रेस घातला असून माधुरीने मस्त गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. दोघींचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहते त्यांच्या प्रेमात पडले आहेत.
दोघींनी माधुरीच्या एकेकाळी तुफान गाजलेल्या ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यावर डान्स केला. माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, माधुरी लवकरचं ‘फाइंडिंग अनामिका’ या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पाय ठेवणार आहे.
नोराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास नोरा लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
भल्या मोठ्या सिंहाने त्यांच्या अंगावर झेप घेतली अन्…
‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल
कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ
बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस