अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई | माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेली पहायला मिळते. यातच आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सध्या पूनमच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

पूनम पांडेनं तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तिनं मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिचा पती सॅम बाॅम्बेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पूनमनं तक्रार दाखल केल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंंतर सॅमची चौकशी करत त्याला सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. एनआयनं दिलेल्या वृत्तानुसार पूनम पांडेच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

याआधीही पूनमनं तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी तिचा नवरा सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आहे. त्या दोघांमध्ये भरपूर दिवसांपासून मतभेद सुरु असल्याचं समजंत आहे.

पूनम आणि सॅम दोघेही वेगळे होणार होते. मात्र दोघांनीही समजौता करुन सोबत रहायचं ठरवलं. मात्र दोघांमधील मतभेद काही कमी झाल्याचं दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. 12 सप्टेंबरला या दोघांनी लग्न झाल्याची माहिती लग्नाचे फोटो पोस्ट करुन दिली होती.

पूनम पांडे यापूर्वीही अनेक प्रकणांमुळे चर्चेत राहिलेली आहे. नुकतंच तीनं राज क्रुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणावर खुलासा केला होता. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने मला जबरदस्ती एका करारावार साईन करण्यास भाग पाडले होते. त्यांच्या मागणीनुसार मला पोजींग करावी लागेल अन्यथा ते माझ्या वैयक्तिक गोष्टी लीक करतील, अशी धमकीच मला त्यांनी दिली होती, असा आरोप पूनमने केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

  कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ

  “2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार

 शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप