मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई बनली आहे. तिने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला असून ही खास बातमी प्रियांकानेच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या आनंदाच्या आणि विशेष क्षणात आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असं प्रियंका म्हणाली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वत: प्रियांकानं आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत (Priyanka Chopra Family Planning) भाष्य केलं होतं. ‘निक आणि माझ्या मॅरिड लाईफमध्ये बेबीला (Baby) महत्त्वाचं स्थान आहे.
भविष्याचा विचार करून आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली होती. एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेतून तिनं आई होण्याची इच्छा व्यक्ती केली होती.
प्रियंका आणि निक जोनस हे दोघं 1 डिसेंबर 2018 रोजी लग्नबेडीत अडकले होते. मोठ्या थाटात त्यांचा विवाह पार पडला होता. दोघांचं लग्न भारतीय पद्धतीने जयपूरमध्ये पार पडलं होतं.
ते दोघं मे महिन्यात 2018 मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या या प्रेमाचं काही महिन्यांनी लग्नात रुपांतर झालं होतं. लग्नानंतरही हे जोडपं कायम चर्चेत राहतं. निक जोनस हा अमेरिकेतला प्रसिद्ध गायक आहे.
प्रियंका लग्नानंतर निकसोबतच अमेरिकेत राहते. पण प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे भारतीय चाहत्यांसोबत तिचं एक वेगळं भावनिक कनेक्शन आहे.
दरम्यान, सरोगसी हा पर्याय आतापर्यंत भारतातील अनेक सेलिब्रिटींनी निवडलेला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान, आमीर खान, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर अशी अनेक नावे यात आहेत. आता प्रियांकाचं नाव या यादीत जोडलं गेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ही’ लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा; Omicron ची 14 लक्षणं समोर
“अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा आरोप
अखेर तारीख ठरली! आमिर खानने केली मोठी घोषणा
प्रियंका गांधी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत??? मोठं वक्तव्य आलं समोर
Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती