अभिनेत्री प्रियंका चोप्रा विमानात पिली होती दारु अन्…, अटेंडंटनं सांगितला ‘तो’ मजेदार किस्सा

मुंबई| देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियंकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबरंच प्रियंकाने हॉलिवूडमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

प्रियंका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. अनेकदा आपले फोटो पोस्ट करत असतात. प्रियंका फोटो पोस्ट करताना अनेकदा जोनससोबतचे फोटो शेअर करते. तसेच प्रियंका आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असते. सध्या तिचा एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे. एका फ्लाइट अटेंडेंटने सांगितलेल्या किस्स्याची चर्चा रंगली आहे.

प्रियंका क्वाँटिको या मालिकेमुळे चर्चेत आली होती. त्यावेळेचा हा किस्सा आहे. एका फ्लाइट अटेंडंटनी रेडइट वेबसाइटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. पण काहीच काळात हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डीलिट करण्यात आला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर उपलब्ध नसला तरी हा किस्सा लोकांच्या आजही लक्षात आहे.

अटेंडंट म्हणाली,‘प्रियांकानं मला बोलावलं आणि ब्लॅक मेरी हे कॉकटेल मागवलं. त्यासोबत हॉट सॉस पण तिनं मागवलं होतं. प्रियांकानी 3 कॉकटेल ड्रिंक्स घेतली आणि दारुच्या नशेत ती पूर्ण टल्ली झाली होती. मग प्रियांका कुणाशी काहीच बोलली नाही आणि झोपून गेली.’

सामान्यपणे दारूच्या नशेत माणूस अजब चाळे करतो, दंगा घालतो किंवा मनात कुणाबद्दल काही असेल तर बोलून टाकतो असं घडताना अनेकदा ऐकलं, पाहिलेलं असतं. त्यामुळे प्रियांकानी असं काही केलं का अशी उत्सुकता सगळ्यांच्या मनांत होती पण ती शांत झोपून गेली.

नुकत्याच झालेल्या बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करताना प्रियांकाने मँडेरिन कॉलरचं गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. या जॅकेटची किंमत 3915 युरो म्हणजे 3 लाख 52 हजार 75 रुपये इतकी होती. तिनी या सोहळ्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी ती ‘अनफिनिश्ड’ या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती ‘द व्हाइट टाइगर’ चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.

महत्वाच्या बातम्या – 

शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…

‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…

अभिनेत्री वैदेही परशुरामीनं खरेदी केली ‘ही’ नवी…

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्रीनं घेतली कचरापेटीत…

ज्या ड्रेसमुळे ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ट्रोल…