Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

लग्नाआधी बिनधास्त सेक्स करा, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं दिला सल्ला

Actress Rekha Video
Actress Rekha

मुंबई | लग्नाआधी सेक्स करावा की करु नये प्रश्नावर आपल्याकडे अनेक वादविवाद झडताना पहायला मिळतात. अनेकांचा याला विरोध आहे तर काहीजण याला पाठिंबा देताना दिसतात. मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी यावर आपलं मत मांडलं होतं आणि ते चांगलंच वादात सापडलेलं पहायला मिळालं.

लग्नाआधी सेक्स करण्यात काहीच चूक नाही, असं अभिनेत्री रेखा यांनी म्हटलं होतं. आपल्याला एखादा माणूस समजून घ्यायचा असेल तर सेक्सशिवाय ते शक्य नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. सेक्सशिवाय तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ जाणंच शक्य नाही, असं रेखा यांनी म्हटलं होतं.

रेखा यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता, त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात होतं. रेखा यांना या वाक्यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्रासही फार झाल्याचं त्यांनी त्यानंतर सांगितलं.

रेखा यांनी या मुलाखतीनंतर जाहीर बोलणं तसेच टीकाटिपण्णी करणं टाळण्याचा निश्चय केला होता. त्यांनी अनेक विषयांवर बोलणं यानंतर टाळलं होतं. मात्र यानंतर आपल्याला या गोष्टीमुळे फार फरक पडला नाही, असं जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं.

रेखा यांचं वैयक्तिक आयुष्यही चांगलंच वादग्रस्त राहिलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचं नाव वारंवार जोडलं गेलं, मात्र दोघांनीही जाहीरपणे या मुद्दयावर बोलणं टाळलं, तसेच जाहीर व्यासपीठांवरही त्यांनी एकमेकांना टाळणंच पसंत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम, पब, पार्टी, पेग आणि पेंग्वीनमुळे झाली”

“आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही, राजकारण असंच असतं” 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं”